वार्ताहर/ जमखंडी
बागलकोट जिल्हय़ात रविवार दि. 28 रोजी आणखी 17 जणांना कोरोनाची बाधा झाली तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. राजेंद्र यांनी दिली. एकाच दिवशी 17 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बाधित संख्या 180 झाली असून यातून 117 जण बरे होऊन घरी परतले आहेत.
बागलकोट विनायनगर येथील 42 वर्षाचा पुरुष, मुधोळची 39 वर्षाची महिला, 46 वर्षाचा पुरुष, महाराष्ट्रातून परतलेली 70 वर्षाची महिला, 26 वर्षाचा युवक यांना कोरोना झाला आहे.
कलादगी येथील रुग्ण क्रमांक 8300 च्या संपर्कामुळे बिळगी तालुक्यातील गलगली येथील 13 वर्षाची मुलगी, कलादगी येथील 11 वर्षाची मुलगी, 35 वर्षाची महिला, 15 वर्षाची मुलगी, 23 वर्षाची युवती, 37 वर्षाचा पुरुष, 25 वर्षाची युवती, 27 वर्षाची महिला, 8 महिन्याचा मुलगा, 20 वर्षाचा तरुण, 22 वर्षाचा युवक यांना बाधा झाली तर बागलकोट येथील खासगी दवाखान्यात दाखल झालेल्या 50 वर्षाच्या व्यक्तीस कोव्हीड बाधा झाल्याचे आढळून आल्याने जिल्हा कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला.
आतापर्यंत 12098 नमुने प्रयोग शाळेला पाठविण्यात आले असता 10986 निगेटिव्ह, 180 पॉझिटिव्ह, एकूण 4 जणांचा बळी गेला असल्याची माहिती जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. के. राजेंद्र यांनी दिली.