नव्या वर्षात भारतीय शेअर बाजार मोठय़ा घसरणीसह आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी बंद झाला आहे. नफावसुलीच्या कारणास्तव सेन्सेक्स कोसळला आहे. सेन्सेक्समध्ये 746 अंकांची तर निफ्टीत 218 अंकांची घसरण झालेली पाहायला मिळाली.
सेन्सेक्स 746 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 48,878.54 वर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 218 अंकांच्या घसरणीसह 14,371.90 अंकांवर बंद झाला.आशियाई बाजारातील सुस्ताईचा परिणाम शुक्रवारी शेअर बाजारात दिसला. सकाळच्या सत्रात निफ्टीचा निर्देशांक 0.7 टक्के घसरुन 14,491 वर तर सेन्सेक्स 350 अंकांच्या घसरणीसह 49,278 वर व्यवहार करत होता. गुरुवारी सेन्सक्सने 50 हजाराचा सर्वोच्च टप्पा गाठला होता. पण दिवसअखेर घसरणीसह सेन्सक्स बंद झाला होता. रिलायन्स इंडस्ट्रिजचा तिमाही निकाल जाहीर होण्याच्या शक्मयतेने समभाग 1.4 टक्के नुकसानीत होते. गुरुवारपर्यंत समभागाचे भाव 8 टक्के इतके वाढले होते. सकाळी बाजाराची सुरुवातच मुळी घसरणीसह झाली. बँकींग व धातू कंपन्यांचे समभाग नफ्यात होते. ऍक्सीस बँकेच्या समभागाच्या भावात 3 टक्के घसरण आली. एचडीएफसी बँक, एचडीएफसी, बजाज फायनान्स, रिलायन्ससह कोटक बँकेच्या समभागांवर दबाव दिसून आला.
शेअर बाजारात दुपारी 12.20 वा. बीएसईवरील 2 हजार 876 समभागांपैकी 1776 समभाग घसरणीसह व्यवहार करत होते. विक्रीला जोर आल्याने लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल 195.80 लाख कोटींवर आले. ऑटो क्षेत्राने मात्र बाजारात तेजी घेतली होती. बजाज ऑटोचे समभाग तर 19 टक्क्मयापर्यंत तेजी दर्शवत होते. याखेरीज हिरो मोटोकॉर्प (6.27 टक्के), टाटा मोटर्स (3 टक्के) व आयशर मोटर्सचे समभाग (3 टक्के) तेजीत होते. निफ्टी ऑटो निर्देशांक 3 टक्के वाढीसह व्यवहार करत होता. दुसरीकडे मात्र हिंडाल्को, ऍक्सीस बँकेचे समभाग 3 टक्क्मयांची घसरण नोंदवत होते. धातू क्षेत्रातील कंपन्या जेएसडब्ल्यू स्टील व टाटा स्टीलही घसरण नोंदवत होते.
इंडिगो पेंटस्चा आयपीओ 21 जानेवारीला 6.97 पट भरला गेला आहे. शुक्रवारी हा आयपीओ बंद झाला. होम फर्स्ट फायनान्सच्या आयपीओला चांगला प्रतिसाद लाभला असून 25 जानेवारीला तो बंद होणार आहे.
आशियाई बाजारात दबाव
आशियाई बाजारात शुक्रवारी सुस्ती दिसून आली. जपानचा निक्की 0.50 टक्के, हाँगकाँगचा हँगसेंग 1.28 टक्के व चीनचा शांघाई कम्पोझीट 0.83 टक्के घसरणीत होता. कोरियाचा कोस्पी मात्र 0.38 टक्के तेजीसह व्यवहार करत होता.