कोविड तांत्रिक सल्लागार समिती, टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णय
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचार वगळता लसीकरण, ओपीडी, कोविड चाचण्या यासह सर्व वैद्यकीय सेवा आरोग्य केंद्रांच्या व हॉस्पिटलच्या बाहेर देण्यास सुरूवात करा, असा आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांनी दिला आहे. हॉस्पिटल्सवर असणारा ताण लक्षात घेऊन सरकारने हा बदल केला आहे. उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांच्या अध्यक्षतेखाली कोविड तांत्रिक सल्लागार समिती व राज्य कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या सर्व सरकारी व खासगी हॉस्पिटल्समध्ये कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हा विभाग वगळता लसीकरणासाठी व अन्य उपचारासाठी येणाऱया रुग्णांना आत येणे व बाहेर जाणे यासाठी वेगळी व्यवस्था करणे शक्मय नाही. एकीकडे लसीकरणासाठी प्रचंड मागणी वाढत आहे. दुसरीकडे रुग्णसंख्याही वाढत आहे. रुग्णांच्या संपर्कात अन्य कोणी येऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या आदेशानुसार लसीकरण केंदे जवळच्या शाळा, महाविद्यालये, समुदाय भवन येथे सुरू करावीत. स्थानिक जिल्हा पंचायत, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी यासाठी पुढाकार घ्यावा. प्राथमिक आरोग्य केंदे, तालुका आरोग्य केंद्रांमध्ये लस देणे शक्मय आहे का? याचा विचार करावा. मात्र, ज्या सरकारी हॉस्पिटल्समध्ये लस देण्यासाठी पूर्णतः स्वतंत्र विभाग आहे व येण्याजाण्याची स्वतंत्र सुविधा आहे तेथे ही मोहीम राबविता येणार आहे.
लसीकरणासंबंधी महत्त्वाच्या सूचना
लस देण्यासाठी योग्य जागा असावी, वेटींग रूम, ज्ये÷ नागरिकांना व दिव्यांगांना सहज येता येईल अशी जागा असावी. 108 क्रमांकावर रुग्णवाहिकांना लसीकरण केंद्राची जागा कोठे आहे, याची कल्पना द्यावी. लसीकरण केंद्रांवर मोठे बॅनर किंवा फलक लावावेत. या मोहिमेसाठी एनसीसी, एनएसएस, स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था यांची मदत घ्यावी. या केंद्रावर डॉक्टर व आरोग्य सेवक यांनी सदैव उपलब्ध असणे आवश्यक आहे. लसीकरण केंद्राच्या बदललेल्या जागेबाबत जनतेला कल्पना द्यावी, असेही अभियानाच्या संचालकांनी कळविले आहे. त्याच्या प्रती सर्व संबंधित विभागांना पाठविण्यात आल्या आहेत.