उमेदवार बदलण्याचे मोन्सेरात यांचे संकेत : पणजी मनपा निवडणूक
प्रतिनिधी / पणजी
पणजी महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या पाठिंब्याने आमदार बाबूश मोन्सेरात यांनी जाहीर केलेल्या पॅनलला आता भाजपमधीलच काहीजण हरकत घेऊ लागले असल्याचे समोर आले आहे. परिणामी या पॅनलमधील एखाददुसरा उमेदवार बदलण्याचे संकेत मिळाले आहेत.
त्यासंबंधी आमदार मोन्सेरात यांनीही एखाददुसरा उमेदवार बदलू शकतो, असे स्पष्ट केले आहे. आपण जाहीर केलेल्या पॅनलला बाहेरून विरोध नाही. पक्षांतर्गतच काहीजणांनी विरोध दर्शविला आहे, असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.
कोणत्या प्रभागात उमेदवार बदलू शकतो का? असे विचारले असता, नेमका प्रभाग क्रमांक आपण जाहीर करत नाही, मात्र एखाददुसरा उमेदवार बदलू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. विरोध करणारे पाठिमागे बोलतात. खरा नेता हा समोर येऊन बोलतो. त्यामुळे ज्यांना आपल्या पॅनलमधील उमेदवाराबद्दल विरोध आहे त्यांनी समोर येऊन बोलावे, असेही बाबूश म्हणाले.
भाजपने जाहीर केलेल्या पॅनलमध्ये सध्या निवड झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत.
प्रभाग-1 : माल्कम आफोंसो, प्रभाग-2 : युवराज फर्नांडीस, प्रभाग-3 : रोहित मोन्सेरात, प्रभाग-4 : पॅरोलिना पो, प्रभाग-5 : शुभदा शिरगावकर, प्रभाग-6 : किशोर शास्त्री, प्रभाग-7 : बेंतो लॉरेन्स, प्रभाग-8 : राहूल लोटलीकर, प्रभाग-9 : सुरय्या माखिजा पिंटो, प्रभाग-10 : प्रसाद आमोणकर, प्रभाग-11 : करण पारेख, प्रभाग-12 : वर्षा शेटय़े, प्रभाग-13 : प्रमय माईणकर, प्रभाग-14 : उदय मडकईकर, प्रभाग-15 : शायनी चोडणकर, प्रभाग-16 : अस्मिता केरकर, प्रभाग-17 : डेनिस जॉर्ज, प्रभाग-18 : अदिती चोपडेकर, प्रभाग-19 : नरसिंह मोरजकर, प्रभाग-20 : शुभम चोडणकर, प्रभाग-21 : मनिषा मणेरकर, प्रभाग-22 : दिशा माईणकर, प्रभाग-23 : शेखर डेगवेकर, प्रभाग-24 : प्रांजल नाईक, प्रभाग-25 : संजीव नाईक, प्रभाग-26 : वसंत आगशीकर, प्रभाग-27 : लॉरेन डायस, प्रभाग-28 : विठ्ठल चोपडेकर, प्रभाग-29 : शैलेश साळगावकर, प्रभाग-30 : सँड्रा डिकुन्हा.