वार्ताहर / पिंपळगाव
बारवे (ता.भुदरगड)येथे ग्रामपंचायतीसमोर कागल तालुक्यातील मासा बेलवाडीचे शहीद जवान साताप्पा महादेव पाटील यांचे वीर पिता महादेव शंकर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी वीर माता आनंदी महादेव पाटील याही उपस्थित होत्या.
यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने विद्यामंदिर व माध्यमिक विद्यालय बारवे या सर्व शाळेतील गुणवत्ताधारक व शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य जीवन ज्योती अभियानांतर्गत पंचायत समिती भुदरगड च्यावतीने भरविण्यात आलेल्या महिला प्रदर्शनात गावातील तीन महिला बचत गटांनी सहभाग घेतल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी सरपंच सुनिता सुनील किरोळकर, उपसरपंच रंगराव पाटील, मंगल गोपाळ राणे, सुवर्णा आनंदराव पाटील, राजश्री सुनिल चव्हाण, जहिदा सिराजुद्दीन देसाई, आप्पासाहेब सुतार, जोतीराम शिंदे, धनाजी पाटील, पोलीस पाटील प्रकाश पाटील, माजी सरपंच सिताराम पाटील, माजी सरपंच सुलतान देसाई, माजी सरपंच बी. आर. पाटील, सर्व आजी माजी सैनिक सर्व विविध संस्था त्यांचे पदाधिकारी गावातील तरुण मंडळाचे पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या.