रविवारी 35 नवे रुग्ण : विद्यार्थ्यांची तपासणी सुरू : ऑनलाईन क्लास सहभागींची तपासणी नाही
प्रतिनिधी / बेळगाव
मंगळवार दि. 17 नोव्हेंबरपासून शहरातील महाविद्यालये सुरू झाली आहेत. 2 हजार 321 हून अधिक प्राध्यापक व कर्मचाऱयांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. यापैकी 1202 अहवाल निगेटिव्ह आले असून सात प्राध्यापकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. रविवारी 35 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
1357 पैकी 1202 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आणखी निम्म्याहून अधिक अहवाल यायचे आहेत. सध्या विद्यार्थ्यांची स्वॅब तपासणी हाती घेण्यात आली आहे. ऑनलाईन क्लासमध्ये सहभागी होणाऱया विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार नाही. थेट महाविद्यालयात शिक्षणासाठी जाणाऱया साडेतीन हजारहून अधिक विद्यार्थ्यांची स्वॅब तपासणी होणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. संजीव डुमगोळ यांनी दिली आहे.
स्वॅब तपासणी करण्याची महाविद्यालयनिहाय यादी उपलब्ध झाली आहे. शहरातील गोमटेश पॉलिटेक्निकमध्ये 42 जणांची तपासणी झाली आहे. संगोळ्ळी रायण्णा कॉलेजमध्ये 60, आरपीडी कॉलेजमध्ये 118 जणांची तपासणी झाली होती. यापैकी तिघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जीएसएस कॉलेजमध्ये 81 जणांची तपासणी झाली होती, त्यामध्ये दोघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
ज्योती कॉलेजमध्ये 221, मराठा मंडळ पॉलिटेक्निकमध्ये 72, गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकमध्ये 67, सरदार्स कॉलेजमध्ये 12 जणांची तपासणी झाली आहे. अंजुमन कॉलेजमध्ये 25 जणांची तपासणी करण्यात आली होती. एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शिंदोळी येथील भरतेश पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये 94 जणांची तपासणी झाली होती, त्यामध्ये एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
निम्म्या अहवालांची प्रतीक्षा
आर. एन. शेट्टी पॉलिटेक्निकमध्ये 53, बेननस्मिथ कॉलेजमध्ये 22, लिंगराज कॉलेजमध्ये 94, गोगटे कॉलेजमध्ये 98, हुंचेनहट्टी येथील जैन इंजिनियरिंग कॉलेजमध्ये 100, पीपल ट्री कॉलेजमध्ये 41, एस. जी. बाळेकुंद्री कॉलेजमध्ये 100, केएलई इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 154 जणांची तपासणी झाली आहे. आणखी निम्म्याहून अधिक प्राध्यापक-कर्मचाऱयांचे अहवाल यायचे आहेत.
सक्रीय रुग्णांची संख्या 357
रविवारी बेळगाव शहर व उपनगरांतील 8 व ग्रामीण भागातील 2 अशा तालुक्मयातील दहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पंतनगर, लक्ष्मीनगर-गणेशपूर, वीरभद्रनगर, काकर गल्ली, राणी चन्नम्मानगर, बसव कॉलनी, रविवारपेठ, बसवाण गल्ली, शाहूनगर परिसरात नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 25 हजार 460 इतकी झाली आहे. 24 हजार 760 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 357 सक्रिय रुग्ण आहेत. अद्याप 810 स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत.