प्रतिनिधी / बार्शी
चालकाचा गाडीवरील ताबा सुटुन छोटा हत्ती रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाल्यामुळे अपघात झाला. त्यामध्ये, छोटा हत्ती वाहनातील सहा जण जखमी झाल्याची घटना आज रविवारी सकाळी 9.20 वाजण्याच्या सुमारास पुणे-लातुर राज्य मार्गावरील बार्शी-पांगरी दरम्यानच्या वानेवाडी येथील फाट्याजवळ घडलली.
या अपघातातील सर्व जखमी उदगिर (लातुर) येथुन मुंबईकडे निघालेला छोटा हत्तीमधुन जात असताना हा प्रकार घडला. जखमीमध्ये तीन महिला, दोन लहान मुले व एका पुरूषाचा समावेश आहे. जखमींना 108 रूग्ण वाहिकेमधुन बार्शी येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.