ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आले आहेत. काल रात्री उशिरा चाचणीचे अहवाल प्राप्त झाले. त्यात बाळासाहेब थोरात यांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, बाळासाहेब थोरात यांच्या मुंबईतील बंगल्यातील टेलिफोन ऑपरेटरला दोन दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले होते. त्यानंतर बाळासाहेब थोरात हे होम क्वारंटाईन झाले होते.
थोरात यांच्या बंगल्यावरचा टेलिफोन ऑपरेटरला कोरोनाची बाधा झाल्यावर बंगल्यातील सर्व कर्मचारी आणि संपर्कात आलेल्या अन्य 20 लोकांची कोरोनाची टेस्ट करण्यात आली आहे.