नवी दिल्ली
गेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये बिगर जीवन विमा निगम क्षेत्रातील प्रीमियमच्या माध्यमातून 17 हजार 679 कोटी रुपये प्राप्त झाले असल्याची माहिती विमा प्राधिकरणाकडून प्राप्त झाली आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे.
31 बिगर जीवन विमा कंपन्यांनी प्रीमियमच्या माध्यमातून ऑक्टोबरमध्ये 17 हजार 679 कोटी रुपये मिळवले आहेत. मागच्या ऑक्टोबरपेक्षा याखेपेस कामगिरी अधिक सरस झाली आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये 15 हजार 906 कोटी रुपये प्रीमियमच्या माध्यमातून प्राप्त केले होते असेही सांगण्यात येत आहे. त्यामध्ये सरकारच्या मालकीच्या न्यू इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेडने 2 हजार 705 कोटी रुपये प्रीमियम अंतर्गत मिळवले आहेत. यानंतर आयसीआयसीआय लोम्बार्ड जन.इन्शुरन्स कंपनीचा नंबर लागतो.