वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑस्ट्रेलियात होणाऱया बिग बॅश लीग टी-20 स्पर्धेत भारताचा 28 वर्षीय क्रिकेटपटू उन्मुक्त चंदने मेलबर्न रेनेगेड्स संघाशी करार केला आहे. या स्पर्धेत खेळणारा उन्मुक्त चंद हा भारताचा पहिला क्रिकेटपटू आहे.
भारतातील आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उन्मुक्त चंदने तीन हंगामामध्ये विविध संघांचे प्रतिनिधीत्व केले होते. दिल्ली, मुंबई आणि राजस्थान संघांनी त्याला करारबद्धही केले होते. आपल्या 10 वर्षांच्या क्रिकेट कालावधीत उन्मुक्त चंदने 67 प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत. 2012 साली ऑस्ट्रेलियात झालेल्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या युवा श्व़िचषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध उन्मुक्त चंदने नाबाद 111 धावांची खेळी करून भारताला विजेतेपद मिळवून दिले होते.