टीव्हीवरील रिएलिटी शो ‘बिग बॉस’च्या पुढील सीझनसाठी स्पर्धकांची नावे समोर येत आहे. शोच्या निर्मात्यांनी अभिनेत्री भूमिका चावला हिला बिग बॉस 15 साठी ऑफर दिल्याचे समजते. यंदाच्या शोमध्ये चित्रपटजगत आणि टीव्ही इंडस्ट्रीशी संबंधित लोकांसोबतच सामान्य नागरिकही दिसून येणार असल्याचे मानले जात आहे.
‘तेरे नाम’ या चित्रपटातील जोडी पुन्हा एकदा या शोच्या निमित्ताने एकत्र दिसून येऊ शकते. सलमान खानच्या या लोकप्रिय चित्रपटातील भूमिकाच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. पण या चित्रपटानंतर अभिनेत्रीची बॉलिवूडमधील कारकीर्द फारशी चमकू शकली नव्हती. पण तिने ‘दिल ने जिसे अपना कहा’, ‘रन’ हे चित्रपट तर ‘भ्रम’ या वेबसीरिजमध्ये काम केले होते. भूमिकाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मात्र मोठे नाव कमावले आहे.
बिग बॉसमध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची प्रेयसी राहिलेल्या रिया चक्रवर्तीचीही एंट्री होण्याची शक्यता आहे. याचबरोबर अनुषा दांडेकर, नेहा मर्दा, दिशा वकानी आणि पार्थ समथान यासारखे कलाकार यात दिसून येऊ शकतात.