प्रतिनिधी/ बेळगाव
शुक्रवारी सायंकाळी वीज कोसळून बिडी (ता. खानापूर) येथील एक जण जखमी झाला. त्याला येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती धोक्मयाबाहेर असल्याचे कुटुंबियांनी सांगितले.
सलिम रफीक शिल्लेदार (वय 46, रा. बिडी) असे त्याचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या घराच्या छतावर काम करत असताना अचानक वादळी वाऱयासह पावसाने हजेरी लावली. त्याचवेळी वीज कोसळून सलीम जखमी झाला.