प्रतिनिधी /बेळगाव :
कोरोनाबाधित गर्भवती महिलांना डिस्चार्ज करण्याची बिम्स प्रशासनाला घाई लागली आहे. या अनागोदींमुळे बाधितांचे कुटुंबीय संतप्त झाले असून नेमके काय चालले आहे, याची माहिती देण्यासही अधिकाऱयांनी टाळाटाळ केली आहे. यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
एकीकडे जिल्हय़ात कोरोना बाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे बिम्सवर वाढत्या रुग्णसंख्येचा ताण पडतो आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन आता सर्व तालुक्मयात कोविड-19 केअर सेंटर सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे केवळ लक्षणे असणाऱयांनाच बिम्समध्ये हलविण्यात येत आहे. तरीही बिम्सचा कारभार सुधारण्याची चिन्हे दिसत नाहीत.
पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या अधिकाऱयांच्या बैठकीत बिम्सच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. यामध्ये सुधारणा करण्याची सूचनाही करण्यात आली होती. जिल्हय़ातील वेगवेगळय़ा भागातून उपचारासाठी आलेल्या गर्भवती महिलांची काळजी वाढली आहे. गुरुवारी बिम्स प्रशासनाने काही महिलांना डिस्चार्ज करण्याची घाई सुरू केली होती. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना विरोध केला. कुटुंबीयांनी बिम्सचे वैद्यकीय संचालक विनय दास्तीकोप यांची भेट घेऊन ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
ज्यांच्या प्रसूतीला अद्याप अवधी आहे अशा गर्भवतींनाच डिस्चार्ज करण्यात येत असल्याचे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले.
यासंबंधी अधिक माहिती घेण्यासाठी डॉ. विनय दास्तीकोप यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाहेत. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिम्समध्ये 30 हून अधिक गर्भवती महिला उपचार घेत आहेत. यामध्ये काही जणींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर काही संशयित आहेत. कुटुंबीयांना त्यांची काळजी वाटत आहे.
सारी वॉर्डलाही सुरक्षेची मागणी
गेल्या आठवडय़ात सिव्हिल हॉस्पिटलवर हल्ल्याची घटना घडली होती. रुग्णवाहिका जाळय़ात आली होती. या पार्श्वभूमीवर सारी वॉर्डलाही सुरक्षा पुरविण्याची मागणी बिम्सच्या वैद्यकीय संचालकांनी जिल्हाधिकाऱयांकडे केली होती. यासंबंधी पोलीस आयुक्तांना सुरक्षा वाढविण्याची सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली आहे. सारी वॉर्डमध्ये उपचार घेणाऱया रुग्णांना आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी फोनची व्यवस्था करण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱयांनी बिम्स प्रशासनाला केली आहे.