वार्ताहर / शेडगेवाडी
शिराळा तालुक्यातील बिळाशी येथील 60 वर्षीय व्यक्ती पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यातून उस्फूर्तपणे गाव तीन दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पश्चिम भाग हादरला आहे. कोपरखैराने मधून बिळाशी येथे 60 वर्षीय व्यक्ती 11 तारखेस पत्नी व मुलासोबत आला होता.त्यांना येथील हायस्कुल मध्ये कॉरंनटाईन करण्यात आले होते. त्यातील 60 वर्षीय व्यक्तीचा स्वॅब पॉझिटिव्ह आल्याने त्यास मिरज येथील कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर त्याच्या पत्नी व मुलास शिराळा येथील आई टी आय मध्ये कॉरंन्टाईन करण्यात आले आहे. रुग्णाच्या कुटुंबास जेवण पोहोच करणाऱ्या दोन घरातील लोकांना होम कॉरंन्टाईन करण्यात आले आहे. यामध्ये बिळाशी येथील एक व्यक्ती आहे. या सर्वांच्या संपर्कातील लोकांची यादी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने 20 पथके तयार करण्यात आली आहेत उद्यापासून सर्वेचे काम सुरु करण्यात येणार आहे.
तहसीलदार गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम , कोकरुड प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.व्ही. एम. घुले यांनी तात्काळ भेट देऊन उपाय योजना सुरू केल्या आहेत तर हायस्कुल परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.