ऑनलाईन टीम / बिहार :
बिहारमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 25 हजारच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. शनिवारी राज्यात 739 नव्या रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे बिहारमधील कोरोना बाधितांची संख्या 24 हजार 967 वर पोहचली आहे, अशी माहिती बिहारच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार आज आढळलेल्या रुग्णांमध्ये अरवाल 10, बांका 9, बेगूसराय 9, भागलपुर 40, भोजपुर 8, बक्सर 26, चायबसा 1, दरभंगा 6, पूर्वी चंपारण 34, गया 28, गोपालगंज 5, गुमला 1, जहानाबाद 8, कैमूर 1, लखीसराय 17, मधेपुरा 9, मधुबनी 7, मुंगेर 9, मुजफ्फरपुर 85, नालंदा 52, नवादा 2, पाटणा 137, पूर्णिया 4, रोहतास 45, सहरसा 11, समस्तीपुर 29, सारण 39, शेखपुरा 14, शिवहर 3, सीतामढी 5, सिवान 7, सुपौल 21, वैशाली 14 आणि पश्चिम चंपारण मधील 43 जणांचा समावेश आहे.