ऑनलाईन टीम / बिहार :
बिहारमध्ये मागील 24 तासात 713 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 5 जणांचा मृत्यू झाला. त्यासोबतच बिहारमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 34 हजार 553 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कालपासून 668 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर बिहारमधील एकूण 2,34,553 रुग्णांपैकी आता पर्यंत 2 लाख 27 हजार 714 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात रुग बरे होण्याचे प्रमाण 97.08 % आहे. तर आतापर्यंत 1,253 कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, बिहारमध्ये आतापर्यंत जवळपास 1 कोटी 44 लाख 12 हजार 044 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 5 हजार 585 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
- शहर कोरोनामुक्त संख्या
- अररिया 6,779
- अरवल 2,133
- औरंगाबाद 4,645
- बांका 3,122
- बेगुसराय 7,148