नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी एमटीएनएल आणि बीएसएनएल यांची मालमत्ता केंद्र सरकार विक्री करणार असल्याचे समजते. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग यांच्या संकेतस्थळावर बीएसएनएल, एमटीएनएलसंबंधीत मालमत्तेबाबत माहिती देण्यात आली असून याकरीता 1100 कोटी रुपये निर्धारीत करण्यात आले आहेत. बीएसएनएलची मालमत्ता हैदराबाद, चंदीगड, भावनगर तसेच कोलकाता येथे आहे तर मुंबईत गोरेगाव येथे एमटीएनएलची मालमत्ता विक्रीसाठी उपलब्ध आहे.