प्रतिनिधी/ बेळगाव
भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडने आपल्या 46 व्या स्थापना दिनानिमित्त पेट्रोलपंपावर नेक्ट्सजेन प्युअर फॉर शुअर या उपक्रमांतर्गत मानवी हस्तक्षेप विरहित यांत्रिकीकरण केलेल्या इंधन भरण्याच्या प्रक्रियेला सुरवात केली आहे. याचा विस्तार 100 शहरांमध्ये करण्यात येणार आहे.
बेळगावात गोगटे पेट्रोलपंपावर याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अविनाश पोतदार, एमटी रिटेल ल्युब्सचे सुबिर मंडल, टीसी रिटेलचे के. संजीव रेड्डी व बीपीसीएल अधिकारी उपस्थित होते.
नेक्ट्सजेन प्युअर फॉर शुअर हा उपक्रम 2019 मध्ये सुरु केला असून सर्व प्रक्रियेचे यांत्रिकीकरण करण्यात आले आहे. मानवी हस्तक्षेप नसल्यामुळे ग्राहक अधिक पारदर्शकतेचा अनुभव घेऊ शकतात. याशिवाय 100 टक्के खात्रीशीर इंधनाची गुणवत्ता व प्रमाण, आयपीएसव्दारे 100 टक्के सुरक्षित व्यवहार व स्वयंचालित यंत्राव्दारे पावती, ‘यू-फिल’व्दारे ग्राहकांचे वेळ, तंत्रज्ञान व पारदर्शकता यावर पूर्ण नियंत्रण राहते. आधुनिक व आभासी तंत्रज्ञानामुळे ग्राहकांची फोटोसहित नोंद राहते, स्वयंचालित प्रणालीव्दारे प्रत्येक व्यवहारानंतर ग्राहकांना त्वरित मोबाईलला अपडेट पाठविले जाते. एसबीआय क्रेडिट कार्डधारकांना खास सवलत, ग्राहकांना सुरळीतपणे इंधन भरुन घेण्यासाठी पेट्रोलपंपावर विशेष रचना, अशा सुविधा ग्राहकांना मिळणार आहेत.