बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोविड प्रकरणांमध्ये वाढ होत असताना बृह बेंगळूर महानगरपालिका पुन्हा कोविड केअर सेंटर (सीसीसी) सुरू करण्याची योजना आखत आहे. आवश्यक असल्यास एक कोविड केअर सेंटर वापरासाठी तयार ठेवा, असे निर्देश बीबीएमपीचे आयुक्त एन. मंजुनाथ प्रसाद यांनी आपल्या कर्मचार्यांना दिले आहेत. मागील वर्षी कोरोना साथीच्या पहिल्या लहरी दरम्यान, सर्व कोविड रूग्णांना त्यांच्या संसर्गाच्या तीव्रतेच्या आधारे कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयात हलविण्यात आले. तथापि, अधिकाधिक रुग्णांनी घरात अलग राहणे पसंत केल्यामुळे, कोविड केअर सेंटर हळूहळू बंद करण्यात आले. आता कोविड प्रसाराच्या नव्या लाटेमुळे बीबीएमपी काही कोविड केअर सेंटर स्टँडबाईवर ठेवण्याचा विचार करीत आहे.
लग्नाच्या हॉलनंतर पालीकेचे मार्शल सिनेमा हॉलवर लक्ष केंद्रित करतील. बेंगळूरमध्ये कोविड सीएबी काटेकोरपणे लागू करण्यासाठी बीबीएमपी अधिकारी आणि आरोग्य तज्ञांनी शुक्रवारी कृती योजना बैठक घेतली. बैठकीत बीबीएमपीचे आयुक्त एन. मंजुनाथ प्रसाद यांनी , “मार्शल व्हाईट बोर्डच्या गाड्या थांबवणार नाहीत तर प्रवाशांसह टॅक्सी आणि व्यावसायिक वाहनांची काटेकोरपणे तपासणी करतील. दोन मार्शल आपापल्या कार्यक्षेत्रात लग्नाच्या सभागृहांना भेट देऊन नियमांचे पालन केले जाते की नाही याची माहिती घेतील. तसेच नियमांचे उल्लंघन होत असेल तर दंड लावण्यासाठी ते चित्रपटगृह, बाजारपेठे आणि मॉललाही भेट देतील. सीएबीचे पालन न केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार अशी ठिकाणे बंद केली जातील. ” प्रोटोकॉलचे पालन केले जाऊ शकते यासाठी बीबीएमपीने पोलीस आणि इतर अंमलबजावणी करणार्या एजन्सीजमध्ये काम करण्याची शक्यता शोधून काढली पाहिजे असे सुप्रसिद्ध एपिडेमिओलॉजिस्ट डॉ. गिरीधर बाबू यांनी सुचविले आहे.