वार्ताहर /उचगाव
उचगाव येथील आंबेडकर नगरातील ‘बी. आर. आंबेडकरनगर’ या कमानीचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्ष जावेद जमादार होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचे पूजन ग्रा. पं. सदस्य एल. डी. चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. बी. आर. आंबेडकरनगर कमानीचे भूमिपूजन ग्रा. पं. अध्यक्ष जावेद जमादार, सदस्य बाळकृष्ण तेरसे व सर्व सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत भगवे फेटे बांधून आंबेडकर भवनचे अध्यक्ष यादो कांबळे यांच्या हस्ते व उपस्थित नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला ग्रा. पं. सदस्य मोनाप्पा पाटील, यादो कांबळे, बंटी पावशे, गजानन नाईक, उमेश बुवा, सूरज सुतार, दत्ता बेनके, स्मिता खांडेकर, अनुसया कोलकार, अमरीन बंकापुरे, रूपाली गिरी, रूपा गोंधळी, पुंडलिक पावशे, तसेच नामदेव कांबळे, लक्ष्मण कांबळे, नारायण मेस्त्री, मल्लाप्पा कांबळे, रामा कांबळे, नागेश कांबळे, अप्पाजी कांबळे, लक्ष्मण कांबळे, आनंद कांबळे, गजानन कोरे, सुखदेव कोलकार, कल्लाप्पा डाबरे, तसेच आंबेडकरनगर येथील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आप्पाजी कांबळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.