प्रतिनिधी / सांगली
माजी उपसभापती व पंचायत समिती सदस्य विक्रम पाटील यांच्या गेल्या २ ते ३ वर्षापासून केलेल्या पाठपुरावा मुळे व प्रयत्नातून बुधगांव येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी०२ बुधगांव ता. मिरज येथील मुख्य इमारतीमधील खराब झालेल्या फरशी त्यावरती बेड काँक्रिटसह व्हट्रीकाईड फरशी बसवणे, रिप्लँस्टर करणे, नवीन सेलिंग करणे, पार्टीशन करणे, दरवाजे करणे व खिडक्या बदलणे, रंगरंगोटी करणे, छताचे पत्रे बदलणे, बाहेरील बाजूची शेडची दुरुस्ती करणे, नवीन कंपाऊंड बांधणे, बाहेरील बाजूस बेड काँक्रिटसह पेव्हींग ब्लॉक बसविणे व विद्युतीकरण करणे यासाठी जिल्हा नियोजन समिती याच्या निधीतून रक्कम रूपये ५४ लाख ४१ हजार ०१४ रूपये निधी मंजूर करण्यात आला.
या कामी खा. संजय काका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, जि. प. उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, भाजपा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, मनोहर पाटील, संभाजी पाटील, अभिजीत गावडे व पशुवैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामपंचायत बुधगांव यानी सहकार्य केले.