990 जण कोरोनामुक्त : 11,851 सक्रिय रुग्ण
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिल्हय़ात कोरोना रुग्णसंख्येने हजाराची वाटचाल सुरूच ठेवली आहे. बुधवारी 1006 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 990 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या 24 तासांत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. बेळगाव शहर व उपनगरांतील 300 हून अधिक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्हय़ातील एकूण रुग्णसंख्या 67 हजार 782 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 55 हजार 344 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 11 हजार 851 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 7 जणांचा समावेश आहे.
गोकाक तालुक्मयातील 6, हुक्केरी, चिकोडी, बैलहोंगल तालुक्मयातील प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतचा मृतांचा आकडा 587 वर पोहोचला आहे.
गणेशपूर, कंग्राळी बी. के., हुंचेनहट्टी, निलजी, भेंडिगेरी, बडस के. एच., सुळगा-हिंडलगा, बस्सापूर, मारिहाळ, मच्छे, संतिबस्तवाड, गौंडवाड, धामणे, के. के. कोप्प, पिरनवाडी, सांबरा, मोदगा, आंबेवाडी, कोंडुसकोप, बोकनूर, केदनूर, बसुर्ते, वाघवडे, हिंडलगा, पणगुत्ती, बामणवाडी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
शहापूर, भाग्यनगर, वडगाव, खासबाग, शिवबसवनगर, सदाशिवनगर, टिळकवाडी, वैभवनगर, शांतीनगर, शाहूनगर, दरबार गल्ली, अनगोळ, टीचर्स कॉलनी, गोंधळी गल्ली, आनंदनगर, फुलबाग गल्ली, माळी गल्ली, गुड्सशेड रोड, कणबर्गी, लक्ष्मीनगर, नाझर कॅम्प-वडगाव, भारतनगर-वडगाव, पोलीस हेडक्वॉर्टर, कोनवाळ गल्ली, हनुमाननगर, शिवाजीनगर परिसरातही नवे रुग्ण आढळून आले आहेत.
महांतेशनगर, अशोकनगर, संगमेश्वरनगर, अंजनेयनगर, रुक्मिणीनगर, मार्कंडेयनगर, कोतवाल गल्ली, महाद्वार रोड, भवानीनगर, बिम्स क्वॉर्टर्स, वझे गल्ली-वडगाव, बसवण कुडची, सहय़ाद्रीनगर, विश्वेश्वरय्यानगर, कॅम्प, चव्हाट गल्ली, विनायकनगर, हिंदवाडी, कुमारस्वामी लेआऊट परिसरातही बुधवारी नवे रुग्ण आढळून आले आहेत.