वृत्तसंस्था / मेलबोर्न
येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत टिमी बॅबोस आणि ख्रिस्टीना मॅलेडेनोव्हिक यानी महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत बॅबोस आणि मॅलेडिनोव्हिक या जोडीने दुसऱयांदा ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत महिला दुहेरीचे विजेतेपद मिळविले आहे.
हंगेरीची बॅबोस आणि फ्रान्सची मॅलेडेनोव्हिक यानी शुक्रवारी झालेल्या महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात टॉप सिडेड जोडी तैवानची वेई आणि स्ट्रायकोव्हा यांचा 6-2, 6-1 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव केला. मेलबोर्नमध्ये कडक उन्हाळा जाणवत असल्याने बॅबोस आणि मॅलेडेनोव्हिक यांची चांगलीच दमछाक झाली.या स्पर्धेत सलग तिसऱयांदा बॅबोस आणि मॅलेडेनोव्हिक यानी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला तर गेल्यावर्षी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. बॅबोस आणि मॅलेडेनोव्हिक या जोडीने महिला दुहेरीत ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत सहाव्यांदा अंतिम फेरीट गाठली होती. या जोडीने 2018 साली या जोडीने ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेचे तर 2019 साली प्रेंच ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत टेनिस स्पर्धेंचे विजेतेपद मिळविले होते. 2014 च्या विंम्बल्डन आणि 2018 च्या अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत त्यानी उपविजेतेपद मिळविले होते.