बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने सोमवारी बेंगळुरूच्या हद्दीत बेंगळूर आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र (बीआयईसी) येथे भारतातील सर्वात मोठे कोविड केअर सेंटर (सीसीसी) चे उद्घाटन केले.
सीसीसी सुविधेसाठी १०,१०० बेड असतील, परंतु सोमवारी पहिल्या टप्प्यात केवळ ६,५०० बेड्ससह उपलब्ध करून दिले आहेत. राज्य सरकारच्या माहितीनुसार कोविड -१९ रूग्णांसाठी ५ हजार बेड आरक्षित आहेत तर१५०० बेड हे कोरोना चाचणी घेणाऱ्या आरोग्य सेवकांसाठी आहेत. याठिकाणी विद्युत पुरवठा, सुरक्षारक्षक म्हणून कर्नाटक राज्य राखीव पोलिस दल (केएसआरपी) आणि फायर अॅण्ड इमर्जन्सी बटालियन सारख्या इतर सुरक्षा उपलब्ध आहेत.