बेंगळूर/प्रतिनिधी
देशभरात कोविड -१९ प्रकरणे वाढत असल्याने कर्नाटक सरकारने सोमवारी १३ वा बेंगळूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (बीआयएफएफ) अनिश्चित काळासाठी तहकूब करण्याचा निर्णय घेतला आहे.
“आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा विभागाने दिलेल्या निरीक्षणाच्या अनुषंगाने कर्नाटक सरकारने बीआयएफएफची १३ वी आवृत्ती अनिश्चित काळासाठी तहकूब करण्याचे आदेश दिले आहेत,” असे आयोजकांनी नमूद केले.
२४ ते ३१ मार्च दरम्यान हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार होता आणि त्याची तयारी सुरू होती. कर्नाटक चलचित्र अकादमीने गेल्या महिन्यात शहरातील ओरियन मॉलमधील पीव्हीआर येथे हा कार्यक्रम ११ स्क्रीनवर होणार असल्याचे जाहीर केले होते.