बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर येथील मौर्य सर्कल याठिकाणी इंधन दरवाढीचा निषेध म्हणून आम आदमी पक्षाच्या सदस्यांनी निदर्शने केली. राज्यात इंधनाच्या किंमती वारंवार गगनाला भिडत आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आणखी त्रास होत आहे. पेट्रोल दर वाढ होत असल्याने आंदोलनाचा पवित्रा घेत आंदोलकांनी आपली वाहने ढकलली आणि केंद्रातील मोदी-आघाडी सरकार आणि येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात असलेल्या सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.