बेंगळूर/प्रतिनिधी
मंगळवारी ब्रिस्बेन येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया-भारत कसोटी सामन्यावर सट्टेबाजी केल्याच्या आरोपाखाली बेंगळूर शहर पोलिसांच्या सेंट्रल क्राइम ब्रँचने (सीसीबी) शहरातून एका क्रिकेट बुकीला अटक केली.
सह पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, छापा दरम्यान सीसीबीने आरोपींकडून २५१,००० रुपये रोख आणि एक मोबाइल फोन जप्त केला आहे. दरम्यान कारवाईबद्दल पाटील यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.