बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (केएसआरटीसी) बुधवारी ‘आयसीयू ऑन व्हील्स’ ही सेवा सुरू केली. म्हणजेच बसमध्ये आयसीयू सेवा उपलब्ध करून दिली आहे. केएसआरटीसीचे एमडी शिवयोगी सी. कलसाद यांच्या म्हणण्यानुसार बस एम्बुलेंस सारख्या सुविधेमध्ये रूपांतरित झाली असून यात पाच ऑक्सिजनयुक्त बेड, व्हेंटिलेटर आणि इतर वैद्यकीय उपकरणे, आपत्कालीन औषध सुविधा, विजेसाठी जनरेटर आणि इतर सुविधा असतील. दरम्यान हे आयसीयू युनिट बेंगळूरमधील रुग्णालयाजवळ उभे केले जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.