बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर मधील डी. जे. हळ्ळी हिंसाचार प्रकरणातील संशयित आरोपी आणि माजी महापौर आर. संपत राज फरार झाला आहे. आर. संपत राज खासगी रुग्णालयात कोरोना झाल्याने उपचार घेत होता. उपचारानंतर बरे होऊन बाहेर पडल्यांनंतर ते फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
डी. जे. हळ्ळी हिंसाचार आरोपपत्रात नाव असलेला माजी महापौर आर. संपत राज डी. जे. हळ्ळी दंगलीप्रकरणातील तो संशयित आरोपी आहे. कोरोना झाल्याने तो उपचार घेत असलेल्या खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर तो फरार आहे. त्याला शोधण्यासाठी व त्याला अटक करण्यासाठी मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी मोहीम सुरू केली आहे.
सीसीबीने १२ ऑक्टोबर रोजी अंतरिम आरोपपत्र दाखल केले होते, ज्यात त्यांनी आर. संपत राज यांना फरार आरोपी म्हणून वर्णन केले होते. ११ ऑगस्ट रोजी रात्री झालेल्या हिंसाचारात पुलिकेशिनगरचे आमदार अखंड श्रीनिवासमूर्ती यांच्या घराला आग लावण्यात आली होती. या घटनेत तो सहभागी असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.
आरोपपत्र दाखल होण्याच्या काही दिवसांपूर्वी संपत राज चौकशीसाठी दोन समन्सला उत्तर देण्यास अपयशी ठरला होता, त्यामुळे सीसीबीने त्याला फरार आरोपी म्हणून घोषित केलं आहे.