बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. यापार्श्वभूमीवर केएसआरटीसीच्या बसवेश्वर बस स्टँड कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर आणि तळ मजल्यावर बुधवारी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. या केंद्रात गरजूंसाठी दोनशे खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यक असल्यास, येथे आणखी शंभर बेड ठेवता येतील अशी व्यवस्था करण्यात अली आहे. बुधवारी या केंद्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री लक्ष्मण एस. सवदी, केएसआरटीसीचे व्यवस्थापकीय संचालक शिवायागी सी. कलसाद यांनी केले.
यावेळी संचालक दक्षता व सुरक्षा डॉ. रामनिवास सेप्ट, बीएमटीसीचे संचालक पी अँड ई डॉ. के. अरुण, प्राकृत हॉस्पिटलचे सीईओ डॉ. श्रीनिवास चिरुकुरी, रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट प्रांतपाल नागेंद्र प्रसाद आदी उपस्थित होते. कोविड केअर सेंटरच्या स्थापनेसाठी अडवाणी केअर फाऊंडेशन आणि नियोनिका आय ट्रस्ट हे महत्त्वाचे भागीदार आहेत.
यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी (परिवहन) कर्मचार्यांना, चालकांना व वाहकांना सामाजिक अंतर राखण्यासाठी व कर्तव्य बजावताना मास्क घालण्याची विनंती केली.
चारही परिवहन महामंडळात कोविड -१९ पॉझिटिव्हचे १ हजार कर्मचारी आहेत, त्यातील ७०० बरे झाले आहेत. या केंद्रात केएसआरटीसी, बीएमटीसी, एनडब्ल्यूकेआरटीसी आणि एनईसीआरटीसी मधील कर्मचार्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना निम्मे बेड उपलब्ध आहेत.