बेंगळूर/प्रतिनिधी
सोमवारी बेंगळूरमध्ये नवीन एकात्मिक हवाई रुग्णवाहिका सेवा सुरु करण्यात आली आहे. या हवाई रुग्णवाहिकेचे उद्घाटन कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याहस्ते करण्यात आले. हवाई रुग्णवाहिकेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम बेंगळूर शहरातील जक्कूर एरोड्रोम येथे झाला.