बेंगळूर/प्रतिनिधी
शहरातील सर्वात लांब भूमिगत मेट्रो कॉरिडॉर होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी बोगदा खोदणारे बोअरिंग मशीन सुरू केल्यांनतर शहरातील सर्वात लांब भूमिगत मेट्रो कॉरिडॉरसाठी कॅन्टोन्मेंट स्टेशन व शिवाजीनगर दरम्यान बोगद्याचे काम सुरू करण्याची घोषणा बेंगळूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (बीएमआरसीएल) गुरुवारी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी 30 जुलै रोजी एक टनेल बोरिंग मशीन स्थापन केले. उर्जा नावाचा टीबीएम कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर स्थानकांदरम्यान बोगदा (उत्तर-बाऊंड बोगदा) असेल. हा बोगदा अपेक्षित भूगर्भीय कठिण खडकात सुमारे 250 मीटर, मिश्र जमिनीत 350 मीटर, आणि मातीमध्ये सुमारे 255 मीटर आहे, “असे निवेदनात म्हटले आहे.
बीएमआरसीएलच्या अधिकाऱ्यांनी आणखी पुष्टी केली की पहिला टीबीएम पूर्णत्वास येताच दुसरा टीबीएम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. शहरातील सर्वात लांब भूमिगत मेट्रो कॉरिडोर हा डायरी सर्कल ते नागावारा दरम्यान 14 किलोमीटर अंतरापर्यंत नियोजित आहे.