बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात १४ दिवसांचा क्लोज डाऊन मंगळवारी रात्रीपासून सुरु झाला आहे. दरम्यान राजधानीत कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (केएसआरटीसी) कर्नाटक राजधानीच्या विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बुधवारी बेंगळूर विमानतळ ते म्हैसूर आणि मडिकेरी अशी ‘फ्लाय बस’ सेवा सुरू ठेवली.
१२ मे (सकाळी am वाजता) पर्यंत राज्यभरातील कर्फ्यू दरम्यान वेळापत्रकांचे नियोजनदेखील केले जात असताना अधिकाऱ्यांनी प्रवाशांना तिकीटांसाठी ऑनलाईन बुकिंग सुविधेचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. तिकीट बुकिंग http://ksrtc.karnaka.gov.in या संकेस्थळावर करता येणार आहे.