बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर शहरातील पोलीस ठाण्यांवरील दंगल आणि हिंसक हल्ल्यांबाबत एनआयएने बुधवारी येथे सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या राजकीय शाखा असलेल्या कार्यालयांसह ४३ ठिकाणी शोध घेतल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) च्या प्रवक्त्याने ११ ऑगस्ट रोजी बेंगळूरमधील डीजे हळ्ळी आणि केजी हळ्ळी पोळी ठाण्यांवरील दंगली आणि हिंसक हल्ल्यांसह एसडीपीआयच्या चार कार्यालयासह बेंगळूरमधील ४३ ठिकाणी हे शोध घेण्यात आला असल्याचे सांगितले.
यावेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. एनआयए त्याचा तपस करीत असून हे खटले पोलीस कर्मचाऱ्यांना जखमी करणारे, पोलीस ठाण्यांच्या इमारती आणि सार्वजनिक, खाजगी वाहनांसह सार्वजनिक आणि खाजगी मालमत्ता नष्ट करण्याच्या घटनांशी संबंधित आहेत, असे ते म्हणाले. हिंसाचारावेळी दंगेखोर प्राणघातक शस्त्रास्त्रांनी सज्ज होते.
डी. जे. हळ्ळी पोलीस स्टेशन प्रकरणात आतापर्यंत १२४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आणि केजी हळ्ळी पोलीस ठाण्यात १६९ गुन्हे दाखल आहेत.