बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर हिंसाचार प्रकरणाच्या चौकशीची सूत्रे हाती घेतल्यानंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) मंगळवारी एसडीपीआय नेते मुझमिल पाशा याची बेंगळूर पूर्व भागात हिंसाचार करणाऱ्या जमावाला भडकवण्यासाठी आणि देवराजीवनहळ्ळी (डीजे हळ्ळी) पोलीस ठाण्यावर हल्ला केल्या प्रकरणी चौकशी केली जाणार आहे.
एसडीपीआयचे राज्य सचिव मुझमिल पाशा यांनी यापूर्वी बैठक बोलावली होती आणि पीएफआय / एसडीपीआयच्या सदस्यांना जमावाला भडकवण्यासाठी आणि हिंसाचाराला उद्युक्त करण्याचे निर्देश दिले होते. एनआयएने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,बेंगळूर शहरांतर्गत असलेल्या डीजे हळ्ळी , केजी हळ्ळी आणि पुलकेशी नगर भागात जमाव मोठ्या प्रमाणात जमला होता.
यापूर्वी बेंगळूर शहर पोलिसांनी स्थापन केलेले एक तपास पथक हिंसाचारात कर्नाटकातील मुस्लिमबहुल भागात फायदा उठवण्याचा प्रयत्न करणारी राजकीय संस्था ‘सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ (एसडीपीआय) च्या भूमिकेची चौकशी करीत होती.