बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर येथे तीन दिवसाच्या कृषी मेळाव्यास बुधवारपासून सुरू होणार आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवरहे कृषी प्रदर्शन महत्त्वाचा विषय ठरणार आहे, असे बेंगळूरच्या कृषी विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू एस. राजेंद्र प्रसाद म्हणाले.
हेब्बळ येथील जीकेव्हीके कॅम्पसमध्ये कृषी मेळावा आयोजित केला जाईल. हे कृषी प्रदर्शन वेबसाइटवर आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. यूएएस-बीने कृषी प्रदर्शनासाठी २५ स्टॉल्स उभारले आहेत तर भारतीय बागायती संशोधन संस्था एक स्टॉल लावणार आहेत. यावेळी खासगी शेती विषयक स्टॉल्स असणार नाहीत, असे प्रसाद यांनी सांगितले. यूएएस-बीच्या मते, शेतकरी त्यांच्या शेतीविषयक समस्यांचे निराकरण झूम मीटिंगद्वारे दुपारी २ पासून करू शकतात, असे म्हंटले आहे.