बेळगाव / प्रतिनिधी
बेकिनकेरे ग्राम पंचायतीत वॉर्ड क्रमांक 1 मधून भावकू सावंत, जोतिबा धायगोंडे, लक्ष्मी गावडू गावडे, तर वॉर्ड क्रमांक 2 मधून लक्ष्मी (गंगुबाई) गावडे, बळवंत भोगण तर वॉर्ड क्रमांक 3 मधून राजू सावंत चुरशीच्या लढतीत विजयी झाले आहेत. मतदारांनी नव्या चेहऱयांना संधी दिली आहे.
वॉर्ड क्रमांक 1 मधून छबुताई शंकर कांबळे, वॉर्ड क्रमांक 2 मधून कल्पना कृष्णा कांबळे तर वॉर्ड क्र. 3 मधून लक्ष्मी सोमनाथ सावंत यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे उर्वरित 10 जागांसाठी चुरशीने मतदान झाले.
वॉर्ड क्रमांक 1 मधून शट्टुप्पा भातकांडे, उत्तम भातकांडे, जोतिबा धायगोंडे, गुंडू धायगोंडे, बळवंत कुमरीकर, भावकू सावंत, अरुण भोगण, विठ्ठल भोगण, मंगल गावडे, नागुली लक्ष्मण गडगाणे, लक्ष्मी गावडू गावडे असे 11 जण रिंगणात होते. त्यापैकी भावकू सावंत, जोतिबा धायगोंडे व लक्ष्मी गावडू गावडे हे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. वॉर्ड क्रमांक दोनमधून जयवंत सावंत, बळवंत भोगण, लक्ष्मी गावडू गावडे, आनंदाबाई सनदी, रामा भोगण असे पाच जण रिंगणात होते. त्यापैकी बळवंत भोगण व लक्ष्मी (गंगुबाई) गावडे यांनी विजय मिळविला. वॉर्ड क्रमांक तीनमधून राजू सावंत व बाळू यळ्ळूरकर रिंगणात होते. यामध्ये राजू सावंत 21 मतांनी विजयी झाले. विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
अतिवाडमधील वॉर्ड क्रमांक 4 मधून विजयी झालेले उमेदवार
बेकिनकेरे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात अतिवाड गावचा समावेश असून 4 जागांसाठी 9 जण रिंगणात होते. त्यामध्ये मल्लाप्पा गुंडू पाटील, भरमा सातेरी व्हरकेरी, शांता जाणबा मण्णूरकर, विद्या विजय पाटील विजयी झाले.