न्यूयॉर्क
फ्रान्सचा टेनिसपटू बेनोई पेअर याला कोरोनाची बाधा झाल्याने येथे सोमवारपासून सुरू झालेल्या अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीच्या प्रमुख ड्रॉ मधून वगळण्याचा निर्णय स्पर्धा आयोजकांनी घेतला आहे. सदर माहिती अमेरिकन टेनिस स्पर्धेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पुरूष एकेरीच्या अधिकृत ड्रॉमध्ये पेअरचे नाव काढून टाकण्यात आले असून त्याच्या जागी स्पेनच्या मासेल ग्रेनोलर्सला संधी देण्यात आली आहे. ग्रेनोलर्सचा पहिल्या फेरीतील सामना पोलंडच्या मॅजेकझेकशी होणार आहे. एटीपीच्या क्रमवारीत 22 व्या स्थानावर असलेल्या पेअरची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि तो त्यामध्ये पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याला वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.