आता बैलहेंगल, रामदुर्ग तालुक्मयातही फैलाव : जिल्हयातील बाधितांची संख्या आता 119 वर
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिल्हयातील आणखी 9 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गुरुवारी राज्य आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या दुपारी हेल्थ बुलेटीन मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्हयातील बाधितांची संख्या 119 वर पोहचली आहे.
अजमेर, मुंबई, झारखंड व कोल्हापूर हून परतलेल्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अजमेर हून बैलहोंगल तालुकयातील संपगावला आलेल्या 24 व 25 वषीय दोन तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर रामदुर्ग तालुक्मयातील एका सात वषीय बालिकालाही कोरोनाची लागण झाली आहे. ती कोल्हापूरहून आपली गावी आली होती.
झारखंड मधील शिखरजी हून परतलेल्या 65 वषीय महिला व 63 वषीय महिला, 75 वषीय वृद्धाला तर मुंबईहून आलेल्या 27 वर्षीय तरुण व 29 वर्षीय महिलेला ही कोरोनाची लागण झाली आहे. तर रुग्ण क्रमांक 721 च्या संपर्कातून 43 वषीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे.
गुरुवारी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 4 महिला व 1 बालिकेचा समावेश असून बैलहोंगल व रामदुर्ग तालुकयातही आता कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. खास करुन मुंबई, अजमेर, कोल्हापूर, झारखंड मधील शिखरजी हून बेळगावला परतलेल्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बैलहेंगल तालुकयातील संपगाव व रामदुर्ग तालुक्मयातील कल्लूर येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत.