एकूण बाधितांची संख्या 152 वर, बेळगाव उत्तर भागात रुग्ण संख्या वाढली, होनगा, केदनूर, कट्टणभावी, मरनहोळ येथे आढळले रुग्ण
प्रतिनिधी / बेळगाव
मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांतून बेळगावात आलेल्या चाकरमान्यांमुळे कोरोना रुग्ण संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. शुक्रवारी कर्नाटकात आजवरचे सर्वाधिक 515 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून बेळगावातील 36 जणांचा समावेश आहे. सायंकाळी राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
जिल्हय़ातील बाधितांची संख्या 252 वर पोहोचली असून बेळगाव उत्तर भागात रुग्ण संख्या वाढत चालली आहे. मरनहोळ गावातील दहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कट्टणभावी येथील 5 जण, केदनूर व होनगा येथील प्रत्येकी एक जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या चार गावांतील 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. उर्वरित रुग्ण चिकोडी, हुक्केरी व सौंदत्ती तालुक्मयातील आहेत, अशी माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱयांनी दिली.
रुग्ण क्रमांक 4543 पासून 4578 पर्यंत बुलेटिनमध्ये बेळगावमधील बाधितांचा समावेश आहे. 17 वषीय तरुण, 41 वषीय महिला, 55 वषीय इसम, 25 वर्षीय तरुण, 26 वषीय तरुण, 22 वषीय तरुण, 57 वर्षीय इसम, 23 वषीय तरुण, 17 वषीय तरुण, 25 वषीय तरुण, 27 वषीय तरुण, 30 वषीय महिला, 20 वषीय महिला, 24 वषीय तरुण, 22 वषीय तरुण, 45 वर्षीय युवक, 25 वषीय तरुण, 32 वषीय युवक, 9 वर्षांची बालिका, 36 वषीय युवक, 2 वर्षाची बालिका, 12 वर्षांची बालिका, 31 वषीय युवक, 56 वषीय इसम, 46 वषीय युवक, 12 वषीय बालिका, 60 वषीय वृद्ध, 9 वषीय बालक, 5 वषीय बालक, 44 वषीय युवक, 17 वषीय तरुण, 13 वषीय मुलगा, 31 वषीय युवक, 27 वषीय तरुण, 27 वषीय तरुण, 58 वषीय इसम असे एकूण 36 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
यामध्ये 34 जण मुंबईसह महाराष्ट्रातील वेगवेगळय़ा गावातून बेळगावात आलेले आहेत. तर दोघे जण हरियाणामधून बेळगावात परतलेले आहेत. या सर्व 36 जणांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून आता विलगीकरण कक्षात उपचार घेणाऱया सक्रिय रुग्णांची संख्या 133 वर पोहोचली आहे. बिम्स्चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश दंडगी यांच्या नेतृत्वाखाली रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
मोठय़ा प्रमाणात यंत्रणा राबविण्याची गरज
शुक्रवारी कर्नाटकाला मोठा धक्का बसला आहे. परराज्यातून आलेल्या चाकरमान्यांमुळे एका दिवसांत 515 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यामुळे प्रशासन हादरुन गेले आहे. शुक्रवारी बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी कोरोना नियंत्रणासंबंधी जिल्हा पंचायतीच्या सभागृहात अधिकाऱयांची बैठक घेवून त्यांना सूचनाही केल्या आहेत. सध्याची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता मोठय़ा प्रमाणात यंत्रणा राबविण्याची गरज आहे.
बेळगाव तालुक्मयातील मरनहोळ, होनगा, केदनूर, कट्टणभावी येथे परराज्यांतून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांच्या संपर्कातील लोकांनाही क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येत असून शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्या 36 जणांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. बेळगावातील रुग्ण संख्येत आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कारण परराज्यांतून जिल्हय़ात येणाऱयांचे लोंढे सुरुच आहेत.
आणखी 836 जणांच्या अहवालांची प्रतीक्षा
जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाला आणखी 836 जणांच्या अहवालांची प्रतीक्षा आहे. गुरुवारच्या आकडेवारीनुसार प्रयोगशाळेत 1411 जणांची स्वॅब तपासणी प्रलंबित होती. यापैकी बरेच अहवाल उपलब्ध झाले असून 36 पॉझिटिव्ह तर 539 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 14 दिवसांच्या क्वारंटाईनची संख्या 5 हजार 300 वर पोहोचली आहे. जिल्हय़ातील 13 हजार 325 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून यापैकी 12 हजार 15 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 252 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 126 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
बेळगाव तालुक्मयात सर्वाधिक रुग्ण
उपलब्ध माहितीनुसार बेळगाव तालुक्मयात कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे. त्यानंतरचा क्रमांक चिकोडी, हुक्केरीचा लागतो. शुक्रवारी सकाळच्या आकडेवारीनुसार बेळगाव तालुक्मयातील रुग्ण संख्या 105 होती. चिकोडी-निपाणी 40, हुक्केरी 33, अथणी-कागवाड 15, रायबाग 25, बैलहोंगल 2, रामदुर्ग 2 असा आकडा होता. खानापूर व सौंदत्ती तालुक्मयात आजवर एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. मात्र शुक्रवारी सौंदत्ती तालूक्मयातही कोरोना रुग्णांनी आपले खाते उघडली आहेत. आतापर्यंत जिल्हय़ात 48 प्रतिबंधक क्षेत्र जाहीर करण्यात आले असून 9 ठिकाणचे प्रतिबंध उठविण्यात आले आहे.