प्रतिनिधी/बेळगाव :
कायद्याच्या चौकटीत काम केले. कोणालाही नाहक त्रास दिला नाही. कोणतेही बेकायदेशीर काम केले नाही, याचे मला समाधान आहे. बेळगाव परिसर, येथील वकील, जनता ही अत्यंत भावनिक आहे. त्यामुळे मला येथे काम करताना आनंद मिळाला. हा आनंद मी कधीच विसरू शकत नाही. माझी कलबुर्गीला बदली झाली तरी माझे जिव्हाळय़ाचे नाते बेळगावशी राहील, असे जिल्हा न्यायाधीश आर. जे. सतीशसिंग यांनी सांगितले.
न्यायाधीश सतिशसिंग यांची कलबुर्गी न्यायालयामध्ये बदली झाली. या निमित्त बार असोसिएशनने सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपले भावनिक मत व्यक्त केले. बेळगावमध्ये काम केल्यानंतर मला एक वेगळा अनुभव आला. सर्वांनी जणू आपल्या घरातीलच व्यक्ती असल्याची वागणूक मला दिली. त्याबद्दल बेळगावमधील वकिलांचे आणि जनतेचे मी आभार मानतो.
बेळगावमध्ये शिकण्यासारखे भरपूर आहे. येथील हवामानही चांगले आहे. त्यामुळे येथून जाताना मला वाईट वाटत आहे. मात्र, नोकरी आहे त्यामुळे जावेच लागते, असे म्हणत त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ए. जी. मुळवाडमठ यांनी मुख्य न्यायाधीशांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी वकिलांना जे सहकार्य केले त्याबद्दल आभार मानले. ज्ये÷ वकील एस. बी. शेख, ऍड. एम. बी. जिरली, ऍड. हंपण्णावर यांनीही विचार व्यक्त केले.
प्रारंभी जनरल सेपेटरी आर. सी. पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. उपाध्यक्ष सी. टी. मजगी यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर न्यायाधीश सतीशसिंग यांचा सत्कार बार असोसिएशनच्यावतीने करण्यात आला. यावेळी जॉईंट सेपेटरी शिवपुत्र फटकळ, ऍड. शामसुंदर पत्तार, ऍड. एन. आर. लातूर, ऍड. पी. के. पवार यांच्यासह वकील उपस्थित होते.