हिरेबागेवाडी येथील वृध्देचा मृत्यू कोरोनामुळेच
बेळगाव :
हिरेबागेवाडी (ता. बेळगाव) येथे सोमवार दि. 13 एप्रिल रोजी निधन झालेल्या 80 वषीय वृध्देचा मृत्यू कोरोनामुळेच झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले आहे. बेळगाव जिल्हय़ातील ही पहिली बळी असून राज्यात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात असलेल्या 80 वषीय वृध्देचा सोमवारी सकाळी 10.30 वाजता मृत्यू झाला होता. आरोग्य विभागाने तिचे स्वॅबचे नमुने प्रयोग शाळेकडे पाठविले होते. बुधवारी सांयकाळी जारी करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये या संबधिची माहिती देण्यात आली आहे. रूग्ण क्रंमाक 224 च्या संपर्कातून तिला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.