प्रतिनिधी / बेळगाव
कागवाड तालुक्यातील एका 30 वर्षीय महिलेचा कोरोना वॉर्डमध्ये तडफडून मृत्यू झाला. तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचाराचा काही उपयोग होऊ शकला असल्याने तिचा जिल्हा इस्पितळात तडफडून मृत्यू झाला आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वीच अथणी तालुक्यातील एका 65 वर्षीय वृद्धाचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा रविवारी कोरोनामुळे महिला तडफडून दगावली. त्यामुळे जिल्हा इस्पितळातील कोरोना वार्ड रुग्णांसाठी किती सुरक्षित आहे. हा प्रश्न निर्माण झाला आहे.