हिरेबागेवाडी येथील दहा जणांचा समवेश, बाधितांची संख्या 85 वर
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिल्ह्यातील कोरोना संक्रमितांची संख्या वाढतच चालली आहे. शुक्रवारी आणखी 11 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून यामध्ये हिरेबागेवाडी येथील 10 तर कुडच येथील एकाचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 85 वर पोहोचली आहे. राज्यातील एकूण 45 अहवाल पॉझिटीव्ह आले असून बेळगाव जिल्ह्यातील 11 पैकी पाच माfहलांचा समावेश आहे.
शुक्रवारी दुपारी आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटीनमध्ये हि माहिती देण्यात आली आहे. एका हिरेबागेवाडी येथील आणखी दहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या एकाच गावातील बाधितांची संख्या 47 वर पोहोचली आहे.
हिरेबागेवाडी व कुडची येथील 11 जणांना क्वारंटाईनमधुन सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारच्या अहवालामुळे बेळगावला मोठा धक्का बसला आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून बेळगावला दिलासा मिळत होता. अचानक आणखी 11 अहवाल पॉझिटीव्ह आल्याने एकच खळबळ माजली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 36 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले.