जिल्हय़ाने पार केला चार शतकांचा आकडा : 8 जणांचा मृत्यू : अथणी तालुक्यात रुग्ण संख्या वाढती : एकूण बाधितांची संख्या 2 हजारांहून अधिक
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहर व जिह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येने शनिवारी चार शतकाचा आकडा पार केला. गेल्या 24 तासांत 411 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर कोरोनामुळे 8 जण दगावले आहेत. एका अथणी तालुक्मयात 170 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकूण बाधितांच्या आकडय़ाने 2 हजाराचा टप्पा पार केला आहे.
जिह्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता भितीदायक चित्र निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. अथणी तालुक्मयात रुग्ण संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. ही चिंतेची बाब आहे. शनिवारी एका अथणी तालुक्मयातील 170 हून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या एकच तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 550 वर पोहोचली आहे.
बेळगाव शहर व तालुक्मयातील 77 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये शहरातील 56 व ग्रामीण भागातील 21 जणांचा समावेश आहे.