भुई गल्ली येथील ट्रक चालकाला कोरोना, गुडस्शेड रोड केले सिलबंद
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिह्यातील 8 वर्षाच्या बालिकेसह आणखी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये भुई गल्ली येथील एका ट्रक चालकाचा समावेश असून 8 वर्षाच्या बालिकेलाही कोरोनाची लागण झाली आहे. जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 337 वर पोहोचली आहे.
राज्य आरोग्य विभागाने गुरुवारी सायंकाळी जारी केलेल्या हेल्थबुटेलन नुसार बेळगाव शहर व जिल्ह्यातील आणखी 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये शिवनूर (ता. अथणी) येथील 45 वषीय इसमाचा सारीने मृत्यू झालाचा उल्लेख आहे. जिह्यातील मृतांची संख्या 4 वर पोहोचली आहे.
8 वर्षांच्या बालिका व 46 वषीय इसमाला कोणाच्यासंपर्कातुन कोरोनाची लागण झाली याचा उलगडा झाला नाही. रुग्ण क्रमांक 17021 (46 वषीय इसम), रुग्ण्हा क्रमांक 17022 (8 वषीय बालिका) या दोघा जणांना कोणाच्या संपर्कातून कोरोनाची लागण झाली याची माहिती मिळविण्यात येत आहे.
केरळहून बेळगावला आलेल्या रुग्ण क्रमांक 1690 या 27 वषीय तरुणाला कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर महाराष्ट्रातून बेळगावला आलेला रुग्ण क्रमांक 16961 (35 वषीय युवक), गुजरातहून बेळगावला आलेले रुग्ण क्रमांक 16962 (54 वषीय इसम), व महाराष्ट्रातून आलेला रुग्ण क्रमांक 16963 (52 वषीय इसम) अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
रुग्ण क्रमांक 16964 या शिवनूर (ता. अथणी) येथील 45 वषीय इसमाचा मंगळवारी रात्री सिव्हिल हॉस्पिटलला आणताना मृत्यू झाला आहे. राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटीनमध्ये सारीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अल्लेख आहे. त्यामुळे जिह्यातील मृतांचा आकडा चारवर पोहोचलाआहे. केवळ तीन दिवसांत अथणी तालुक्मयातील दोन व बेळगाव तालुक्मयातील एक असा तिघा जणांचा मृत्यू झाला आहे.
भोई गल्लीत रुग्ण आढळला
भोई गल्लीतील एका 35 वषीय ट्रक चालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. अहवाल पॉझिटिव्ह येताच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांनी रुग्ण वाहिकेतून त्याला सिव्हिल हॉस्पिटलला नेले. बॅरिकेडस् उभे करुन सीलडाऊन करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार ट्रकमध्ये भाजीपाला घेऊन 24 जून रोजी हा 35 वषीय युवक मुंबईला गेला होता. 27 जूनच्या सकाळी तो बेळगावात आला. सर्दी, खोकल्याचा त्रास सुरु झाल्याने 29 जून रोजी उपचारासाठी तो सिव्हिल हॉस्पिटलला गेला. आपण मुंबईहून परतल्याचे सांगितल्यामुळे त्याचे स्वॅब जमविण्यात आले होते. गुरुवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या कुटुंबियांसह संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.