वार्ताहर/ उचगाव
सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी कित्येकवेळा लढे दिले, तुरुंगवास भोगला. एक कुटाळ संघटक, कुशल नेतृत्त्व असलेले सीमाप्रश्न सोडविण्यासाठी जिवाची बाजी लावलेले कै. माजी आमदार बी. आय. पाटील यांच्या निधनाने सीमाबांधवांची मोठी हानी झाल्याचे मनोगत बेळगाव तालुका विविध कार्यकारी संघाचे संस्थापक चेअरमन अशोक पाटील यांनी व्यक्त केले.
सुळगा (हिं.) येथील बेळगाव तालुका विविध कार्यकारी संघामार्फत कै. माजी आमदार बी. आय. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अशोक पाटील बोलत होते. त्यांच्याच हस्ते फोटो पूजन करण्यात आले.
यावेळी व्यवस्थापक एन. वाय. पाटील, प्रकाश बेळगुंदकर यांनी श्रद्धांजलीपर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन बसवंत बेनके, लक्ष्मण खांडेकर, निंगाप्पा देसूरकर, एल. जी. चौगुले, रुक्मिणी कांबळे, अनिता कलखांबकर मल्लाप्पा पाटील, कृष्णा पाटील, मारुती पाटील, हेमा चौगुले, राकेश खांडेकर, हरिष दलवाई, रोहिणी पाटील उपस्थित होते.