बेळगाव
अखिल भारतीय समाजसेवा शिक्षण समिती यांच्यावतीने गांधी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचा वर्धापन दिन आणि वेणू संगीत विद्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी मोतीराम मोहिते होते. म. गांधीजींच्या फोटोचे पूजन बी. डी. मोहनगेकर यांच्या हस्ते झाले. वेणू संगीत विद्यालयाचे उद्घाटन ग्रा. पं. माजी अध्यक्षा लता पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, शैला विनोद मत्तीकोप, संतोष जुटेकर, अशोक भातकांडे, सूर्यकांत हिंडलगेकर, परशराम पाटील, काशिनाथ गंगाराम चिगुळकर, विजयलक्ष्मी गणेश नाईक, पृथ्वीका गणेश नाईक, शुभांगी दिवटे, लक्ष्मण कोलेकर, वैष्णवी मंगनायक, हिरा परमेकर, रमेश कुलकर्णी, मीरा मादार, सोनाली चिखलकर आदींना बेळगाव भूषण समाजसेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी शुभांगी दिवटे यांनी छ. शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला. याप्रसंगी शंकर मुतगेकर, शशिकला जोशी, मधुमती पाटील, श्रीनिवास खामकर उपस्थित होते. सूत्रसंचालन आर. के. ओऊळकर यांनी केले. मुख्याध्यापक टी. डी. पाटील यांनी आभार मानले.