केएससीए ए डीव्हीजन क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यता प्राप्त धारवाड विभागिय क्रिकेट संघटना आयोजित धारवाड विभागीय ए डीव्हीजन क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून बेळगाव स्पोट्स क्लब अ संघाने एसडीएम धारवाड ब संघाचा 93 धावांनी, बीडीके स्पोर्ट्स फौंडेशन हुबळीने क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटक संघाचा 8 धावांनी, एसडीएम धारवाड अ संघाने हुबळी क्रिकेट अकादमी अ संघाचा 3 गडी राखून पराभव केले आणि प्रत्येकी 4 गुण मिळविले.
बेळगाव येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 49.1 षटकात सर्वबाद 236 धावा केल्या. त्यात सुदीप सातेरीने 9 चौकारासह 54, ओमकार वेर्णेकरने 1 षटकार 6 चौकारासह 46, आकाश कटांबळेने 2 षटकार 3 चौकारांसह 40, दर्शन मयेकरने 4 चौकारासह 21, अमर घाळीने 2 षटकार 1 चौकारांसह 20 आदर्श माळीने 16 धावा केल्या. एसडीएम धारवाड ब तर्फे सुनिल कोरीने 29 धावात 3, आदर्श हिरेमठने 45 धावात 3, अब्दुल देवरहोपने 28 धावात 2 तर राघवेंद्र पवारने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसडीएम धारवाड ब संघाचा डाव 36.4 षटकात 143 धावात आटोपला. प्रज्वल बोरण्णावरने 5 चौकारासह 46, करण बडिगेरने 19, सुनिल कुरी व मॅथ्यू न्युरूगल यांनी प्रत्येकी 16, राघवेंद्र पवारने 13 धावा केल्या.
बेळगाव स्पोट्सतर्फे पार्थ पाटीलने 38 धावात 2, आकाश कटांबळे 17 धावात 2, शुभम गौंडाडकरने 29 धावात 2, स्वयम अपण्णावरने 39 धावात 2 तर राहुल बजंत्रीने 1 गडी बाद केला.
एसडीएम संघ विजयी
हुबळी येथे हुबळी क्रिकेट अकादमी अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 41.5 षटकात सर्वबाद 205 धावा केल्या. समर्थ श्रीनिवासने नाबाद 85, विकास दोडमनीने 45 धावा केल्या.
एसडीएम क्रिकेट अकादमी धारवाड संघातर्फे हणमंत मांगलेने 27 धावात 3, सागर मुरगोडने 26 धावात 2 तर परिक्षित उकुंडी, महंमद काशीर, अजय पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल एसडीएम ए संघाने 39.1 षटकात 7 बाद 206 धावा करून सामना 3 गडय़ानी जिंकला. अजय पाटीलने नाबाद 75, रोषण जवळीने 65, तर परिक्षित उकुंडीने 22 धावा केल्या.
धावसरासरीच्या निकषावर बीडीके संघ विजयी
दुसऱया सामन्यात क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटक ब संघाने प्रथम फलंदाजी करताना 48.3 षटकात सर्वबाद 156 धावा केल्या. त्यात श्रीहरी मुदलीहारने 55, सचितसिंग रजपूतने 44 धावा केल्या. बीडीकेतर्फे अंश बुचडीने 17 धावात 5, कार्तिकने 34 धावात 2 तर हार्दिक ओझाने 12 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना बीडीके संघाने 32.1 षटकात 6 बाद 148 धावा केल्या. याचवेळी पावसाने हजेरी लावल्याने धावांच्या सरासरीवर बीडीके संघाला विजयी घोषित करण्यात आले.