वयाच्या 16 व्या वर्षी करत होती वेटरचे काम
स्वबळावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणाऱया अभिनेत्रींमध्ये नोरा फतेहीचा समावेश आहे. बिग बॉसमध्ये सामील झाल्यावर नोरासाठी बॉलिवूडचे दरवाजे उघडले गेले. तिने आतापर्यंत अनेक आयटम साँगमध्ये काम केले आहे. नोरा मूळची कॅनडाची असून बॉलिवूडसाठीचा तिचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. या चित्रपटसृष्टीत स्थान मिळविण्यासाठी तिला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. तिच्या या खडतर आयुष्यातील काही किस्से तिने एका कार्यक्रमादरम्यान सांगितले आहेत.
16 वर्षांची असताना मी वेट्रेसचे काम करत होते. हे काम पॉकेट मनी कमावण्यासाठी करावे लागले आणि 18 वर्षांची होईपर्यंत हे काम करत होते. हे काम करताना योग्य संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व, उत्तम स्मरणशक्ती आणि कामाचा पाठपुरावा इत्यादींची गरज जाणवली. अनेकदा ग्राहकांकडून वाईट वागणूक मिळायची. अशावेळी काय करावे, स्थिती कशी हाताळावी हे प्रत्येकाला माहित असायला हवे असे तिने म्हटले आहे. या कार्यक्रमात तिने कॅनेडियन खाद्यपदार्थांवर चर्चा केली आहे. नोरा अलिकडेच अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘भूज ः द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात दिसून आली होती.